Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'मी काय....

गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘मी काय….

मुंबई l Mumbai

केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (BJP Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केले. या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानावर शिवसैनिक चांगलेच संतापले असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त आहे. . या प्रकरणी आता स्वत: नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया (Narayan Rane first reaction after case registered against him) दिली आहे.

नारायण राणे यांनी म्हंटल आहे की, ‘माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या