वरुण गांधी तृणमूलच्या वाटेवर?

वरुण गांधी तृणमूलच्या वाटेवर?

दिल्ली | Delhi

भाजपाच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक असलेले वरुण गांधी गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

वरुण गांधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याचं बोललं जात आहे.या भेटीमध्ये वरुण गांधी टीएमसीमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

वरुण गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. तसेत आपल्या वक्तव्यामधून भाजपा आणि भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून वरुण गांधी भाजपाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत.

तसेच लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरून वरुण गांधींनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. वरुण गांधींची नाराजी लखीमपूर खिरी हिंसाचारापूर्वीही दिसून आली होती. वरुण गांधींनी ऊसाला ४०० रुपये दर जाहीर करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगींना पत्रही लिहिले होते. तसंच ५ सप्टेंबरला मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतीमध्ये वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन सरकारची गोची केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com