मुंडे साहेबांच्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात; उदयनराजेंनी शेअर केला भावनिक व्हिडिओ

मुंडे साहेबांच्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात; उदयनराजेंनी शेअर केला भावनिक व्हिडिओ

मुंबई | Mumbai

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) या नावाभोवती महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच वलय आहे. उदयनराजे भोसले हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलमुळे बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

कॉलर उडवणे, बाईकची सुसाट रपेट तर पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर कॉलर उडवत फ्लाईंग किस करताना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. मात्र आता उदयनराजे चर्चेत आले ते एका वेगळ्याच प्रसंगामुळे.

उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी आपल्या सोशल मीडियावरून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या तस्वीरीसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंडेंच्या फोटोच्या पाया पडताना उदयनराजे भावनिक झाल्याचं दिसून येत आहे. मुंडे साहेबांच्या आठवणी आजही डोळ्यात पाणी आणतात, असं कॅप्शनमध्ये उदयनराजेंनी म्हटलं आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com