Monday, April 29, 2024
Homeराजकीय'तीरथ सिंह रावत' उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

‘तीरथ सिंह रावत’ उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

दिल्ली | Delhi

उत्तराखंडच्या राजकारणात काल (मंगळवार) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisement -

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्या यांची राजभवनात भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. त्यामुळे उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजता तीरथ सिंह रावत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा ‘तृणमूल’ काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्षातून नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर रावत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यानंतर तीरथ सिंह रावत यांची आज नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठरलं! ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार निवडणूक

कोण आहेत तीरथ सिंह रावत

तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. सन २००० मध्ये, ते नव्याने स्थापना झालेल्या उत्तराखंडचे पहिले शिक्षणमंत्री होते. यानंतर, २००७ मध्ये, त्यांची भारतीय जनता पक्षाकडून उत्तराखंडचे प्रदेश सरचिटणीस, तत्कालीन राज्य निवडणूक अधिकारी आणि राज्य सदस्यता प्रमुख म्हणून निवड झाली. २०१३ उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. २०१२ मध्ये चौबटाखाल विधानसभेचे आमदार होते. तर २०१३ मध्ये उत्तराखंड भाजपा प्रदेशाध्यक्ष झाले. यापूर्वी १९८३ ते १९८८ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, संघटनेचे मंत्री आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (उत्तराखंड) चे राष्ट्रीय मंत्री होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या