दिल्ली । Delhi

भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून, खळबळ उडवून दिली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असं गंभीर आरोप साक्षी महाराज यांनी केला आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्तानं आयोजित उन्नावमध्ये करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

साक्षी महाराज बोलतांना म्हणाले की, 'सुभाषचंद्र बोस यांचा अकाली मृत्यू झाला. माझा आरोप आहे की काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली आहे. हे फक्त त्यांच्या लोकप्रियतेमुळे करण्यात आलं होतं. कारण, सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेसमोर पंडित नेहरू व महात्मा गांधी यांचा कुठच टिकाव लागत नव्हता.'

तसेच 'बोस यांची लोकप्रियता अतिशय जास्त होती. त्यांची लोकप्रियता पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक होती. बोस यांच्या लोकप्रियतेसमोर महात्मा गांधीही कुठेच नव्हते', असं साक्षी महाराज म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सुभाषचंद्र बोस यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अद्यापही गुढ का कायम आहे? पंडीत नेहरु यांनी चौकशी का केली नाही? त्यांच्या मृत्यूबाबतचे सत्य बाहेर यायला हवं.” असं देखील साक्षी महाराज म्हणाले आहेत.

दरम्यान, २३ जानेवारी हा दिवसी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती भारत सरकारकडून 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्तानं देशात निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.