महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदी भाजप खासदाराची वर्णी

आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार होते अध्यक्ष
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदी भाजप खासदाराची वर्णी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद (Maharashtra Kustigir Parishad) बरखास्त करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ३१ जुलै रोजी नागपुरात निवडणूक होणार होती.

मात्र, काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामुळे भाजप खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे.

रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. २०१४ मध्ये दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळवत काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी आपली जागा राखण्यात यश मिळवलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com