Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा

मुंबई | Mumbai

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाशी संबंध (money laundering case linked to Dawood Ibrahim) असल्याचा आरोप करत ईडीने (ED) नवाब मलिक (Nawab Malik) यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली.

- Advertisement -

मंत्री नवाब मलिक यांना १२ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर सोमवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अजूनही महाविकास आघाडी सरकारने (MVA Govt) नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. परंतु भाजपाकडून (BJP) नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

आज अखेर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपाने धडक मोर्चाचे (BJP Morcha) आयोजन केले आहे. या मोर्च्यात भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

दरम्यान सुरवातीला हा धडक मोर्चा भायखळाहून आझाद मैदानाकडे निघणार होता. मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या