चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील|BJP MLA maharashtra
राजकीय

BJP MLA कुठेही जाणार नाही; आम्हीच त्यांचे आणतो आहोत - चंद्रकांत पाटील

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) Pune - महाविकास आघाडी सरकार आमच्यासोबत इतकी खुन्नस काढते आहे कि छोटी छोटी कामे देखील केली जात नाही. त्यामुळे जर आपल्या मतदार संघातील प्रश्न घेऊन जर कुणी आमदार शरद पवार यांना भेटले असेल त्यात गैर काय आहे. परंतु, या भेटींनंतर ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP प्रवेश करणार असल्याचे वातावरण मुद्दामहून महाविकास आघाडीचे काही नेते निर्माण करत आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आमचे कुणीही आमदार कुठेही जाणार नाही पण आम्हीच त्यांचे आणतो आहोत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे.विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Navab malik म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील आरोप केला.

विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहे यावर नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणूकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत.परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही.मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामंही होत नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले असा होत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com