‘पठाण’विरोधात भाजप आक्रमक; दिला ‘हा’ इशारा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण(Pathan) सिनेमात “बेशरम रंग” नावाच्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे.

दीपिकाच्या (deepika padukone) ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. या दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी थेट इशारा दिला आहे

पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारं सरकार आहे, त्यामुळं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी, असं आवाहन राम कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय.

साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत, त्यावर त्यांचं (निर्माता-दिग्दर्शक) काय म्हणणं आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावं. महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही ‘फिल्म’ अथवा सिरीयल चालू देणार नाही आणि ती खपवूनही घेतली जाणार नाही, असा कडक इशारा राम कदम यांनी दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *