नोट एक, डिमांड अनेक! आता PM मोदी, सावरकरांच्या फोटोची मागणी

नोट एक, डिमांड अनेक! आता PM मोदी, सावरकरांच्या फोटोची मागणी

मुंबई | Mumbai

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवरील फोटोबाबत केलेल्या वक्तव्याने आता देशभरात वाद सुरू झाला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गांधीजींच्या फोटोसह देवी लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या मागणीनंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

यानंतर आता भाजपचे राम कदम यांनी ट्विट करत मोदी आणि सावरकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. राम कदम यांनी ट्विट करत नोटांचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत.

यासोबतच अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! अशी कॅप्शन दिली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. राम कदम यांच्यापूर्वी नितेश राणे यांनी ट्विट करत नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची मागणी केली आहे. तर कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. राम कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची मागणी नोटेवर केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com