Video : मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न; विखेंचा थोरातांना टोला

jalgaon-digital
1 Min Read

लोणी | वार्ताहर

एक वर्षांपासून कोविडचे संकट आहे, सुविधांचा अभाव आहे, मंत्री थोरातांना आज कळाले का? असा सवाल करतानाच स्वतःचे अपयश आणि अब्रू झाकण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसर्‍या लॉकडाऊनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्याच्या मागील घोषणेनंतरही गरजूंना धान्य मिळालेले नाही. सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. किमान झालेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लसीकरणासाठी पंतप्रधानानी पुढाकार घेतला; पण केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीककरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेत आहे. मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले का? आपण काय बोलतोय याचे भान आघाडीच्या मंत्र्यांनी ठेवायला हवे. 1 मे पासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘त्यावर’ भाष्य नको

खा.डॉ सुजय विखे यांनी रेमडीसिव्हर इंजेक्शन आणल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर भाष्य करण्यास आ. विखे पाटील यांनी नकार दिला. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून डॉ.सुजय यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम केले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *