सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; अज्ञातवासातील नितेश राणेंची 'ती' पोस्ट चर्चेत

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; अज्ञातवासातील नितेश राणेंची 'ती' पोस्ट चर्चेत

मुंबई | Mumbai

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल (Sindhudurg district bank election result) जाहीर झाले आहेक. यावेळी अत्यंत अनपेक्षित असे निकाल हाती आले आहेत.

संतोष परब हल्ला (santosh parab case) प्रकरणातील संशयित आणि भाजपचे (bjp) उमेदवार मनिष दळवी हे या निवडणुकीत अनपेक्षितरित्या विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे कणकवलीचे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (satish sawant) यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी फेसबुक पोस्टमध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. सतीश सावंत यांना उद्देशून नितेश राणे यांनी 'गाडलाच' असे लिहीत एक फोटो टाकला आहे. या फोटोमध्ये नितेश राणे हे सतीश सावंत यांच्या अंगावर उभे राहिलेले दिसत आहे.

नितेश राणे यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. नितेश राणे हे अज्ञातवासात असल्यामुळे त्यांनी नक्की कुठून ही पोस्ट टाकली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com