औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?

भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य
औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?

अहमदनगर | Ahmednagar

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असे नाव देण्यात आले आहे. तर उस्मानाबादचे धाराशीव ( Dharashiv) असं नामांतर करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून नाव बदलण्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रात्री उशिरा राज्य सरकारनेही राजपत्र जारी करत याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे.

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?
राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात, सरकार राजकारणात गुंतले

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे (Ahmednagar) नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट पडळकर यांनी केलंय.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे व आमदार महादेव जाणकर यांनी विधानपरिषदेत केली होती.

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?
पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

अहमदनगर हे नाव नेमकं कसं मिळालं?

अहमदनगर हे शहर पश्चिम महाराष्ट्रात आहे. जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटनुसार या शहराचा उल्लेख २४० इ.स. पूर्व काळात म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाच्या काळातही आढळतो. मध्ययुगीन इतिहास लक्षात घेतला तर राष्ट्रकुट, चालुक्य आणि त्यानंतर दिल्ली यांनी या प्रदेशावर राज्य केलं. दिल्लीचं वर्चस्व जेव्हा आलं तेव्हा अफगाण सैनिक अल्लाउद्दीन हसन गंगूने बंड पुकारलं. या बंडामुळे दख्खन प्रांतात बहामनी राज्याची स्थापना झाली. काही काळानंतर अहमदनगर (जे तेव्हा निजामशाही म्हणून ओळखले जायचे) त्या साम्राज्यातून उदयास आलेल्या पाच राज्यांपैकी एक झालं.

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमी

१४८६ मध्ये काय घडलं?

इ.स. १४८६ मध्ये मलिक अहमद हा निजामशाह बहामनी सल्तनतीच्या पंतप्रधान या पदावर बसला. राजाने त्याला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तो आपल्या कौशल्याने हाणून पाडला. मे १४९० या वर्षात त्याने अहमदनगरजवळ बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला. १४९४ मध्ये त्याने एक शहर वसवलं जे सीना नदीच्या किनाऱ्यावर होतं. त्यानंतर या शहराला मलिक अहमदने स्वतःचं नाव दिलं जे होतं अहमदनगर.

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?
तुम्हाला माहिती आहे का? 'स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

यानंतर मलिक अहमद निजामशहाने दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला आणि आपलं सैन्य त्या ठिकाणी तैनात केलं. त्यानंतर आपल्या वर्तनाने त्याने परदेशातून आलेले मुस्लिम, स्थानिक मुस्लिम यांची मनं जिंकली. एवढंच नाही तर मराठा शेतकरी आणि ब्राह्मण समाजाचा विश्वासही त्याच्यावर बसला. निजामशहाने ब्राह्मण समाजाचा विश्वास जिंकल्याने हिंदूंची मनं वळवण्यातही त्याला यश आलं असं एक वेबसाईट सांगते.

भारताचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात पंडितजी लिहितात, “१४९० मध्ये अहमदनगरचा संस्थापक असलेला अहमद निजामशाह हा बहामनी राजाचा मंत्री असलेल्या निजाम उल-मुल्क भैरी यांचा मुलगा होता.”

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार?
नारायण राणेंना बाईन पाडलं... बाईनं...!; संजय राऊतांकडून अजितदादांचा VIDEO ट्विट
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com