Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआघाडी सरकारच्या दोन वर्षांवर चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले...

आघाडी सरकारच्या दोन वर्षांवर चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई l Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली. यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर विविध निर्णय आणि मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपासून आघाडी सरकारचे फक्त पैसे कमवायचे धंदे सुरू आहे, अशी टीका पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत निशाणा साधला.

यावेळी पाटील यांनी सुरूवातीलाच १०० कोटी वसुली प्रकरणावरून राज्य सरकारला घेरले. ते म्हणाले की, ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात जबाबदारी होती, त्याच राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. अटकेच्या भीतीने लपवावे लागले. आता ते सीबीआयच्या कोठडीत आहे. सचिन वाझे निलंबित असताना त्याला सेवेत घेण्यात आले. वाझेला पुन्हा सेवेत घेण्याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत’, अशी जहरी टीका पाटलांनी केली.

‘कोविडच्या काळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. कोविडसाठीच्या उपाययोजनासाठीचा ६०० कोटींचा निधी तिजोरीत पडून आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार केंद्राकडेच बोट दाखवत आहे.

लस म्हटलं की केंद्र, व्हेटिंलर म्हटलं की केंद्र. मग या सरकारची जबाबदारी काय? त्यामुळे कोविसह सर्वच विषयात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे लोकांना ज्या-ज्या वेळेला संधी मिळेल, त्यावेळी लोक हे सरकार फेकून देतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही,’ असा दावा पाटील यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या