Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याबबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते आज ठाकरे गटात प्रवेश करणार

बबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते आज ठाकरे गटात प्रवेश करणार

मुंबई | Mumbai

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून नवीन पक्ष उभारणीला करण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गट आणि भाजपवर नाराज असलेले काही माजी आमदार तसेच पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे.

- Advertisement -

आज भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी साजन पाचपते यांचा पक्षप्रवेश होईल. साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात काका विरुद्ध पुतण्या अशी राजकीय लढत पाहायला मिळू शकते. बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडली. त्याचा फटका आमदार पाचपुतेंना सरपंच पदाच्या निवडणुकीतही बसला.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळविला. त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली. मधल्या काळात साजन पाचपुतेंनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती. साजन पाचपुते काष्टी तालुक्यातील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. पण, साजन पाचपुते आणि खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुतेंनी भेट घेतली. त्यावेळी साजन हे ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती होती.

दरम्यान, शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील आपल्या काही समर्थकांसह २३ ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश केला. २३ ऑगस्ट रोजी हा शिवबंधन सोहळा दुपारी १२ वाजता पार पडला होता, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं. प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले भाऊसाहेब वाकचौर २००९ साली खासदार झाले. वाकचौरेंनी तत्कालीन दिग्गज उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि भाजपमध्येही राजकीय प्रवास केला आणि सध्या वाकचौरे शिवसेना ठाकरे गटात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या