Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापडळकरांच्या ‘लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू’वरुन बावनकुळेंची माफी; अजित पवारांसमोर भाजप नतमस्तक?

पडळकरांच्या ‘लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू’वरुन बावनकुळेंची माफी; अजित पवारांसमोर भाजप नतमस्तक?

मुंबई | Mumbai

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. पडळकर यांनी टिका करताना अजित पवारांसोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ही टिका केली होती. पडळकर यांच्या टिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन दुखावले गेल्याने राज्यात भाजप विरोधात संतापाची लाट पसरल्याने भाजप बॅकफुटवर गेला. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार वाढत असल्याचं समजल्यानंतर भाजपने अजित पवार यांची जाहीरपणे माफी (Apology From BJP) मागितली आहे.

- Advertisement -

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पड‌ळकर यांच्या टीकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन दुखावले गेले असेल, तर मी त्यांची माफी मागतो,’ अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी व्यक्त केली. बावनकुळे पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीसाठी उपस्थित होते. त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पडळकर यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच आपण या विषयी गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचित करु, अशीही प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलीय.

NCP Crisis : शरद पवारांना धक्का? आणखी एका खासदार आणि आमदाराचे अजितदादांना समर्थन?

‘पडळकर यापूर्वीही बोलले होते; तेव्हा त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी समज दिली होती. प्रत्येक राजकीय नेत्याला प्रतिष्ठा असते आणि तिला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

‘धनगर समाजात आजही मागासलेपणा असून, तो मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावा, ही भाजपचीही भूमिका आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्याने ते टिकले नाही,’ या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यामुळेच…; बड्या नेत्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप

“पक्षीय राजकारणाची टीका होऊ शकते. व्यक्तीगत टीका होऊ शकत नाही. पडळकर जे काही बोलले आहेत त्याबद्दल मी अजित पवारांना सांगेन, त्यांनी मोठ्या मनाने माफ करावे. शेवटी एक जबाबदार विधान परिषदेच्या सदस्याने या पद्धतीने बोलू नये. भाजपचे ते जबाबदार नेते आहे. त्यामुळे त्यांना मी बोलणार आहे. अजित पवार यांचं जे मन दुखावले आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो’, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्या विरोधातील आंदोलनाकडे मी लक्ष देत नाही”, असे पडळकर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या माफीवर बोलण्यास टाळले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या