क्रुझवरील रेव्ह पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा
क्रुझवरील रेव्ह पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील क्रुझवर आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीत rev party on a cruise सहभागी झालेल्या १० लोकांना पकडले होते. मात्र त्यापैकी दोन लोकांना सोडले असल्याचे समोर आले असून जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा BJP leader's brother-in-law in a rev party असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक NCP spokesperson Nawab Malik यांनी शुक्रवारी केला. भाजपचा हा नेता आणि त्याचा मेहुणा कोण याचा भांडाफोड शनिवारच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सोडून देण्यात आलेल्या दोन लोकांना अमली पदार्थ नियंत्रण पथकाच्या (एनबीसी) कार्यालयात आणण्यात आले होते. त्यांना काही तासांनी सोडण्यात आले. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल मलिक आज पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान काही बाहेरचे हायप्रोफाईल लोक हे प्रकरण हाताळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना ८ ते १० लोकांना पकडल्याचे सांगितले. एक अधिकारी संपूर्ण कारवाई करत असताना तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो? अशी विचारणा मलिक यांनी केली. एनसीबीपेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या. त्यामध्ये २० किलो ड्रग्ज पकडले. त्यामुळे जसजसे पुरावे हाताला लागतील तसतशी यांची पोलखोल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर धाड घालण्याआधी आयकर विभाग अगोदर खुलासा मागू शकले असता. परंतु त्यांनी तसे न करता केवळ बदनामी करण्याचा प्रकार केला. अशा प्रकारच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे मलिक म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचे नेते कुणाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्राची जनता सगळे पाहत आहेत. भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असे आहे का? आता जे भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. भाजपच्या काही आजी-माजी मंत्र्यांनी बऱ्याच बँका बुडवल्या आहेत. त्यांची प्रकरणे देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. नुसते आम्ही आरोप करत बसणार नाही तर पुराव्यासकट आम्ही आरोप करणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले.

Related Stories

No stories found.