भाजप नेते सोमय्या यांचे आरोप बेछूट आणि बिनबुडाचे

- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
भाजप नेते सोमय्या यांचे आरोप बेछूट आणि बिनबुडाचे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

भाजप नेते किरीट सोमय्या BJP leader Kirit Somaiya यांनी बेछूट आणि बिनबुडाचे आरोप allegations करण्याचा उद्योग सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक NCP spokesperson Nawab Malik यांनी मंगळवारी केला.

सोमय्या ज्या संस्थेची बदनामी करत होते त्या संस्थेने त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी न्यायालयाने तसे आदेश दिल्याची माहिती मलिक यांनी दिली.

किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील Kolhapur District नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याआधी सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोप केले आहेत.या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना मलिक यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली.

विनाकारण बदनामी करणार्‍या लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाई करता येते हे लोकांच्या लक्षात आले असून ही आता सुरुवात आहे, असेही मलिक यांनी शिवडी न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सांगितले.

हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे, असेही मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com