Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“फक्त २४ तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…”; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

“फक्त २४ तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…”; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

मुंबई | Mumbai

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यात किरीट सोमय्यांना (Attack on BJP leader Kirit Somaiya) किरकोळ जखम देखील झाली…..

- Advertisement -

हा हल्ला शिवसैनिकांनी (Shivsainik) केला असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, यावरून भाजपानं आता राज्य सरकारवर (State Govt) आणि पोलिस (Police) विभागावर टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान या प्रकारावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना त्यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. (Nitesh Rane on Uddhav Thackeray)

‘त्या’ जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

नितेश राणे (Nitesh Rane) ट्विटमध्ये म्हटलंय की, जर दरदिवशी पोलिसांच्या संरक्षणाखाली भाजपा नेत्यांवर हल्ला होत असेल तर त्याला शौर्य म्हणत नाहीत. ‘मातोश्री’त बसलेल्या मर्द म्हणवणाऱ्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी बाजूला ठेवावं, मग आम्ही हे सगळे हे थांबवू याची खात्री आहे. राज्य सरकार पुरस्कृत गुंडगिरी अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार

नेमकं काय घडलं?

काल नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली. त्यानंतर किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला पोहोचले. यानंतर शिवसैनिक देखील पोलीस स्टेशन बाहेर जमले आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी देत होते. त्यानंतर सोमय्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला.

आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

- Advertisment -

ताज्या बातम्या