सुशांतच्या मँनेजरची बलात्कार करुन हत्या
राजकीय

सुशांतच्या मँनेजरची बलात्कार करुन हत्या

भाजप नेते नारायण राणे यांचा आरोप

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार विरुद्ध बिहार सरकार असा सामना रंगला आहे. या वादात आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. सुशांत सिंहच्या पूर्वीची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

मुंबईतील भाजपा मुख्यालयात नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करत नाही. या प्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही. पण बिहारमध्ये दाखल झाला आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे. सुशांतच्या केसमधील रिया चक्रवर्ती ही प्रमुख व्यक्ती तीन चार दिवसांपासून गायब झालेली आहे. तिला शोधून तिच्याकडून सुशांतची हत्या की आत्महत्या याची माहिती घेणे आवश्यक आहे, असे नारायण राणे म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com