Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयदीड वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीच चढले नाही

दीड वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीच चढले नाही

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोना महामारीच्या काळात 14 ते 15 महिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयाची एक पायरी सुद्धा चढले नाही. मंत्रालयाचे तोंड सुद्धा बघत नाही. फाईलींचा ढिगारा साचला आहे.त्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहे,असा हल्लाबोल भाजपा नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला.

- Advertisement -

गुरुवारी भारतीय जनता पार्टीची बैठक जळगाव वसंत स्मृती कार्यालयात झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा ना.रंजना पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख अ‍ॅड.किशोर काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा नारायण चौधरी, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पी.सी.पाटील,जि.प.सदस्य मधुकर काटे आदी भाजपचे आघाडी प्रमुख उपस्थित होते.

काँग्रेस,एमआयएमच्या पुढे गेली शिवसेना

श्रीराम जन्मीभूमीतील मंदिर पूर्ण होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना प्रयत्न करीत आहे. अयोध्यातील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्या आरोपावरुन शिवसेनेने केलेल्या टिकेच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता.

मात्र,त्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला. याविषयी शिवसेनेला काय म्हणावे ते कळत नाही. शिवसेना भरकटत आहे. शिवसैनिक वाटेल तसे तोंडसुख घेत आहे.

आता तर हिंदुत्वाविरोधात काँग्रेस, एमआयएमच्या पुढे शिवसेना गेली आहे,अशी टीका आमदार महाजन यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या