Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे कुटुंबाच्या अडचणी वाढणार? रेवदंडा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांची दाखल केली तक्रार

ठाकरे कुटुंबाच्या अडचणी वाढणार? रेवदंडा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांची दाखल केली तक्रार

मुंबई | Mumbai

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात ठाकरे आणि वायकर परिवारावर आयपीसी भारतीय दंड संहिता कलम ४१५, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत अन्वये तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे.

नवीन वर्ष, नवे नेते…! किरीट सोमय्यांचे जोरदार प्लॅनिंग, ‘या’ ५ नेत्यांची नावं केली जाहीर

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी किरण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले. किरण पाटील हे सरकारी अधिकारी असूनही मातोश्रीसाठी काम करत होते. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत हे सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच दुसऱ्य दिवशी ते रेवदंडा या ठिकाणी पोहचत तक्रार दाखल केली आहे.

दिवसाढवळ्या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेरात कैद
प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

- Advertisment -

ताज्या बातम्या