मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; सोमय्यांचा गंभीर आरोप

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबासह शिवसेना (shivsena) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच मुंबई 26/11 हल्ल्यात (26/11 attacks) पोलिस अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस (Bulletproof jacket) असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे.

यावेळी बोलतांना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar’) यांचे नवाब मलिक (Nawab Malik) हे दाऊचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कसाबशी व्यावासायिक संबधं. मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत.

तसेच हेमंत करकरेंना (Hemant Karkare) देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट (Bulletproof jacket) हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल (Bimal Agarwal) यांनी पुरवले होते. यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते, असे किरीट सोमय्या म्हणाले.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, शिवसेना नेते, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने (Income Tax Department) बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. यशवंत जाधव हे बिमल कुमार, रामगोपाल अग्रवाल (Ramgopal Agarwal) यांचे भागीदार आहेत. बिमल अग्रवाल यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा जग प्रसिद्ध आहे. कसाब हत्याकांडच्या (Kasab massacre) वेळेला हा घोटाळा उघडकीस आला होता.

तसेच बिमल अग्रवाल यांनी आणि यशवंत जाधव सोबत यांनी पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स ( Samarth Erectors and Developers) असं आहे. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कडून ८०० कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.

समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्सचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या सोबतही आर्थिक/व्यवसायिक संबंध आहेत. समर्थ इरेक्टर्स यांनी श्रीधर पाटणकर सोबत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन/टीडीआर चे व्यवहार केले असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *