Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंशी गद्दारी केली का?; किरीट सोमय्यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंशी गद्दारी केली का?; किरीट सोमय्यांचा सवाल

अलिबाग | Alibag

सरपंच म्हणतात बंगले अस्तित्वात नाही. पण रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) म्हणतात बंगले आहेत. मग नेमके खरे काय? हे जाणून घेण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आलो. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. चर्चा एकदम व्यवस्थित झाली. शिवसैनिक जमले होते. मात्र पुण्यासारखा प्रसंग इथे उद्भवला नाही, असे माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) नावावर कोर्लई (Korlai) गावात १९ बंगले आहेत. याबाबत किरीट सोमय्या (Kirit somaiya) आक्रमक झाले आहेत. १९ बंगल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचे आवाहन किरीट सोमय्या यांना दिले होते. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले.

कोर्लईत सोमय्या आले, शिवसेना भाजपत राडा, माघारी जाताच ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडले

ग्रामपंचायतीला (Grampanchayat) भेट देऊन सोमय्यांनी एक पत्रक ग्रामसेवकांना देऊन रेवदांडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेवर (Shivsena) कडाडून टीका केली आहे.

Photo Gallery : अवघे शहर झाले शिवमय; शिवप्रेमींचा उत्साह शिगेला

ते पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधीत्व करत आहे. ग्रामपंचायत म्हणते की या जागेवर बंगले अस्तित्वात नाहीत. पण मिसेस मुख्यमंत्री म्हणतात बंगले आहेत. नेमके प्रकरण समजायला हवे. आम्ही ग्रामसेवकाला (Gramsevak) कागदपत्रे दिली. त्यावर आजची स्थिती दोन दिवसात कळवतो असे आश्वासन देण्यात आले.

कुणीतरी माझ्या हत्येचा कट रचतंय; सारेगमप फेम वैशाली भैसनेची धक्कादायक पोस्ट

दोन चार तासांमध्ये बंगले कसे गायब होतात. सकाळी म्हणतात बंगले आहेत आणि दुपारी म्हणतात बंगले नाहीत. आता दोन तासांत उद्धव ठाकरेंनी येऊन बंगले तोडले असतील तर पोलिसांनी चौकशी करावी.

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी

महाराष्ट्राच्या जनतेला मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही रश्मी ठाकरे यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का? याबाबत सर्वांना कळू द्या, असे सोमय्या म्हणाले.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

दरम्यान, सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दाखल होताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भाजप (BJP) व शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजुंनी मोठी घोषणाबाजी झाली. ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस (Police) दाखल आहेत. सोमय्या माघारी फिरताच ग्रामपंचायतीत काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या