Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या...तर त्यांची सुंता झाली असती; अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

…तर त्यांची सुंता झाली असती; अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

मुंबई | Mumbai

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सातत्याने पवार कुटुंबावर हल्लाबोल करत असतात. अनेकदा ते टीका करताना पातळी सोडतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही पडळकर यांनी अनेकदा वादग्रस्त टीका केली आहे. त्यातच आज पडळकर यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावरून आता राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे .

- Advertisement -

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. हा वाद आता काहीसा शमला आहे. पण गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे.

“उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण…”; शिंदे गटाच्या बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर बोलताना पडळकर म्हणाले की, ‘आज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही लोकं चुकीचं बोलतायेत. धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं बोलतायेत. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे. धर्मवीर संभाजी महाराजांसोबत कशा चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. त्यांना धर्म बदलण्यासाठी किती त्रास दिला. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही.’

‘संभाजी महाराज हे धर्मवीर नसते.. जे कोणी म्हणतायेत संभाजी महाराज धर्मवीर नव्हते त्यांची कदाचित सुंता झाली असती. जर त्यांना तसं वाटत असेल तर मीडियाला माझी विनंती आहे की, त्यांना जाऊन चेक करा. काय परिस्थिती आहे त्यांची. ही परिस्थिती झाली असती की नसती ते सांगा.’ अशा जहरी शब्दात गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

अबुधाबीहून केरळला येणाऱ्या Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग अन्…

दरम्यान, पडळकर यांच्या याच विधानावर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते, असे आव्हाड म्हणाले आहेत.

‘तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. तुमच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, असे अजित पवार म्हणाले. मी या मताशी सहमत आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते. संभाजी महाराज अन्य काही विचार करत असते, तर त्यांनी सुलतान अकबराला आपल्या जवळ सहा वर्षे ठेवलेच नसते. आपल्या मुलाने बंड केले. या बंडाला संभाजी महाराज मदत करत आहेत, ही बाब औरंगजेबाला सहन होत नव्हती. औरंगजेब अंगावर येण्याचे हे एक कारण होते,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

- Advertisment -

ताज्या बातम्या