Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यागिरीश बापट यांची यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात उपचार सुरु

गिरीश बापट यांची यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात उपचार सुरु

पुणे | Pune

पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, गिरीश बापटांच्या प्रकृतीबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या