देवेंद्र फडणवीस करोनामुक्त; राज्यसभेसाठी मतदानाचा मार्ग मोकळा

देवेंद्र फडणवीस करोनामुक्त; राज्यसभेसाठी मतदानाचा मार्ग मोकळा
देवेंद्र फडणवीस

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची (COVID19) लागण झाली होती. त्यांनी स्वतः याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती.

पण आता देवेंद्र फडणवीस करोनामुक्त झाले असून त्यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान करोनामुक्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. फडणवीसांचे शासकीय निवासस्थान 'सागर' बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकींबाबत (Election) या बैठकांचा सपाटा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com