
मुंबई | Mumbai
देहू (Dehu) येथे झालेल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण न करू दिल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवारांना बोलू न दिल्याने हा महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान आहे, अशी टीका करण्यात येत आहे...
याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या मुद्द्यावर लोकार्पणाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, देहू संस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आले होते. या कार्यकमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधानांच्या भाषणाआधी अजित पवार यांचे भाषण न घेता देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी बोलावण्यात आले. पंतप्रधानांनी पवार यांच्या भाषणाची आठवण करून दिली. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वाभिमानाखातर भाषणास नकार दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच बोलण्यास नकार दिला, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, बसण्याची व्यवस्था अशी होती की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नरेंद्र मोदी (Narendra Modi), अजित पवार (Ajit Pawar) आणि मी. नरेंद्र मोदींचे नाव संयोजकांनी घेतले तेव्हा मोदी जागेवरून उठले नाही. त्यांनी अजित पवारांना बोलण्याचा आग्रह केला. पण अजित पवारांनी नकार दिला.
तसेच मी अगोदर बोलणार नसल्याचे अजित पवार म्हणाले होते. यात अपमानाचा विषयच नाही. अजित पवारांना बोलायला मिळाले नाही यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? असा सवाल त्यांनी केली आहे. हा अनावश्यक वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.