लोकसभा नव्हे, विधानसभेचे अधिवेशन बोलवा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राऊत यांना टोला
लोकसभा नव्हे, विधानसभेचे अधिवेशन बोलवा
चंद्रकांत पाटील

मुंबई / प्रतिनिधी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल जे वर्णन केले आहे, तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतद पाटील यांनी सोमवारी लगावला.

बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी संसदेचे किमान दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राऊत यांनी आज ट्विट करून केली.

संजय राऊत यांच्या या मागणीवर बोलताना पाटील म्हणाले, त्यांचे हे म्हणणे अचूक आहे.पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल.

संजय राऊत हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com