नगर जिल्ह्यात रुग्ण दगावत असताना  पालकमंत्री मूश्रीफ गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत बोंबलत बसले आहेत - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

नगर जिल्ह्यात रुग्ण दगावत असताना पालकमंत्री मूश्रीफ गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत बोंबलत बसले आहेत - चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधि) - नगर जिल्ह्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. एका दिवसाला 30-35 रुग्ण दगावत आहेत. असे असताना नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ 3600 मतदार असलेल्या गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत बोंबलत बसले आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बुधवारी पुण्यातल्या मॉर्डन एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप देण्यात आले यावेळी पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यातबाले त्यावेळी पाटील यांनी पुणे आणि राज्यातल्या परिस्थिती वर भाष्य केले बोलत होते.

पाटील म्हणाले, राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तिथले पालकमंत्री उपस्थित आहेत की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी पाहिले पाहिजे, मात्र नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ 3600 मतदार असलेल्या गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत बोंबलत बसले आहेत अशी टीकाही पाटील यांनी केली. नगर जिल्ह्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. एका दिवसाला 30-35 रुग्ण दगावत आहेत. असे असताना पालकमंत्री लोकांना उपलब्ध होत नाहीत. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी छडी घेऊन बसलं पाहिजे. पालकमंत्री घाबरून लोकांना उपलब्ध होत नाहीयेत असा आरोप करून पाटील म्हणाले, त्या -त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात आहेत की नाही यावर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे लक्ष ठेवले पाहिजे.

पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे ही परिस्थिती सुधारवायची असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसल पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे असेही पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यात रेमडीसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन यांची कमतरता आहे त्यावर सरकार काही करत नाही आणि लॉक डाऊन केले जाते आहेत त्याने काय फरक पडेल असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने घेतलेल्या लसीबाबत आपल्याला काही माहीत नाही मात्र हे सरकार कोरोना, वाजे प्रकरण,अनिल देशमुख प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी आशा गोष्टीवर जास्त भर देत आहे, त्यांच्यावर कारवाई करायची ती करा पण दिवसभर तोच मुद्दा घेऊन टीव्ही समोर बसू नका, त्यापेक्षा रेमडेसिवीर कधी मिळणार, लस कधी मिळणार हे लोकांना सांगा. लोकांना आता आधाराची गरज आहे असेही पाटील म्हणाले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणे हे जरी बरोबर असले तरी त्यानंतर जनतेचे होणारे हाल रोखण्यासाठी राज्य सरकारने काय केले आहे. राज्यात रेमडीसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन यांची कमतरता आहे त्यावर सरकार काही करत नाही आणि लॉक डाऊन केले जाते आहेत त्याने काय फरक पडेल असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com