<p>मुंबई l Mumbai</p><p>मुंबई महानगरापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असे म्हणत गुजराती मतदारांना साद घातली. त्यानंतर या प्रकारावरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधाला आहे.</p>.<p>महाराष्ट्रात करोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा आता बोलबाला सुरू झाला आहे. सध्या अनेक ठिकाणी त्याचे निकाल हाती येत आहे. कोकणामध्ये भाजपाचे एकूण 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्यावरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आशिष शेलार ट्विट करत म्हंटले आहे की, "सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले. अजून निवडणूक बाकी आहेच..कोकण म्हणजे आम्हीच..अशा अहंकारी पक्षाचे "वस्त्रहरण" सुरु झाले रे महाराजा! आता मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो!"</p>.<p>दरम्यान, महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील जागांवर महाविकास आघाडीने एकी दाखवत भाजपाला नामोहरण केले होते. त्यावेळेस काही ठिकाणी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र आल्याने पुणे आणि नागपूर सारखे भाजपाचे वर्चस्व असलेले मतदारसंघात भाजपाच्या हातून निसटले होते. तेव्हा आगामी निवडणूकांमध्येही महाविकास आघाडीमधील पक्षांची एकमेकांना भाजपा विरूद्ध साथ असेल अशी भूमिका होती. त्यामुळे विजयाबाबत विश्वास दुणावलेल्या पक्षांना आज आशिष शेलारांनी टोला लगावला आहे.</p>