
मुंबई | Mumbai
राज्यात सध्या राजकीय समीकरणं बदलत आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
तर आज, रविवारी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला पोहोचले आहेत. आशिष शेलार यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तसंच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.