सोमय्यांच्या रडारावर आता ग्रामविकास मंत्री; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला आरोप

सोमय्यांच्या रडारावर आता ग्रामविकास मंत्री; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला आरोप

मुंबई | Mumbai

भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांच्या यादीत अनिल परब, अनिल देशमुखनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif)यांचे नाव आले आहे. त्यांनी ठरल्याप्रमाणे आज दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्यांवर भ्रष्टाचाराचे आणि शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केला. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे दिल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितले. या पुराव्यात फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे असल्याचं त्यांनी सांगितलं.

सोमय्यांच्या रडारावर आता ग्रामविकास मंत्री; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला आरोप
‘या रावजी’ म्हणणाऱ्या सुरेखा पुणेकर राजकारणात

हसन मुश्रीफ परिवारानं शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत. सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतलं असल्याचं दाखवलं आहे. असे सोमय्यांनी म्हंटल आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात ताहेरा हसन यांच्या नावानं शेअर्स असल्याचं समोर आलं आहे. २०१७ मध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाचा छापा पडला. त्यात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

काय म्हणाले सोमय्या

“मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com