भाजपची उतर नगर जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा पदाधिकार्‍यांची 60 सदस्यीय जम्बो कार्यकारिणी

महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आली. उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी याची घोषणा केली.

या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, संघटन चिटणीस, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सचिव या पदांचा समावेश आहे. भाजप मोर्चा प्रकोष्ट सेल, कायम निमंत्रित सदस्य व काही ठिकाणी तालुक्यातील नेतृत्व बदल देखील करण्यात आले आहेत.

त्यात राहाता तालुका, श्रीरामपूर तालुका यांचा समावेश आहे. काही शहरध्यक्षांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यात संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यांत 60 जणांची वर्णी लागली आहे.

उपाध्यक्ष- शरद थोरात कोपरगाव, अ‍ॅड. रघुनाथ बोठे राहाता, अशोक पवार शिर्डी, गिरजाजी जाधव अकोले, नितीन कापसे राहाता, सुधाकर गुंजाळ संगमनेर, गणेश राठी, सतीश सौदागर श्रीरामपूर, सचिन देसरडा नेवासा, सुदाम सानप संगमनेर.

संघटन सरचिटणीस- नितीन दिनकर नेवासा, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे अकोले. सुनील वाणी श्रीरामपूर, कोषाध्यक्ष रमेश बिडये राहाता, सचिव किरणताई दगडे कोपरगाव, मेघाताई भगत संगमनेर, अनिल भनगडे श्रीरामपूर, राजेंद्र सांगळे संगमनेर, नरेंद्र डंबीर कोपरगाव, दिलीप नगरे नेवासा, कैलास खैरे कोपरगाव, अंकुश काळे नेवासा.

मोर्चा जिल्हाध्यक्ष- महिला मोर्चा अध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी अकोले, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज भानुदास डेरे संगमनेर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विनोद राक्षे कोपरगाव, आदिवासी मोर्चा अध्यक्ष (पान 4 वर)

श्रीरामपुरात चित्ते गटाला डावलल्याने नाराजी

आपल्या कार्यकाळात काम करताना प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूर पालिकेत प्रथमच चार नगरसेवक निवडून आणले व पालिकेत भाजपाचा झेंडा रोवला. भाजपाचे श्रीरामपूर शहरासह तालुक्यात प्रामाणिकपणे काम केले. यावेळी करण्यात आलेल्या निवडीत आमच्याबरोबर निष्ठावान म्हणून काम करणारे तर सोडाच परंतु साध्या कार्यकर्त्यालाही विचारण्यात आले नाही. त्यामुळे नव्याने जाहीर झालेल्या निवड प्रक्रियेचा निषेध करत असल्याचे नगरसेवक माजी शहराध्यक्ष किरण लुणिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे श्रीरामपुरातील भाजपात असलेली गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *