Friday, April 26, 2024
Homeराजकीयराणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु; सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु; सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दिल्ली | Delhi

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून नारायण राणे आपल्या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

- Advertisement -

पहिल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांनी भाजपचे आभार मानले. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी आपल्या भाषाणाची सुरुवात केली. त्यानंतर राणे यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.

नारायण राणे म्हणाले की, ‘राज्यातली जनता महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नाही, उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे,’ असं राणे म्हणाले.

तसेच, ‘मी प्रथमच एवढे दिवस दिल्लीत राहिलो. मी काम आणि विकास करू शकेल या विश्वासाने फडणवीस यांनी मला दिल्लीला पाठवले. फडणवीस यांनी ज्या उद्देशाने पाठवले त्या उद्देशाने मोदी यांना पाठबळ देणार आहे आणि देश आघाडीवर कसं जाईल यासाठी प्रयत्न करेल, असं राणे म्हणाले. राणे म्हणाले की, गर्दी कमी करायच्या मी विरोधात आहे, फक्त नियम पाळा. दीड महिना मंत्री होऊन झाला, एक वेगळा अनुभव मिळाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर आपण नवीन मंत्री झालो अस वाटलं नाही,’ असंही राणे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या