Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबापटांच्या निधनानंतर ४ दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

बापटांच्या निधनानंतर ४ दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनाला काही तास उलटत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. अलीकडेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

- Advertisement -

त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावा सांगायला सुरुवात केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात त्यांच्या समर्थकांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर जगदीश मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला आहे. हाच धागा पकडत आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जगदीश मुळीक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

जितेंद्र आव्हाड यांनी यासंबधी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. १० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.

‘ती’ चूक जीवावर बेतली! डासांना मारणाऱ्या कॉईलमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

दुसरीकडे जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? असा सवाल करत राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे. सूरज चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे.

“लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग…”; पोटनिवडणुकीच्या चर्चेवरून अजित पवार संतापले

भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा असं म्हणत सूरज चव्हाण यांनी मुळीक यांना धारेवर धरलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या