शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; माजी उपमहापौर गीते पक्ष सोडणार

शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; माजी उपमहापौर गीते पक्ष सोडणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे उपमहापौर आणि माजी आमदार वसंत गीते (EX MLA Vasant Gite) यांचे चिरंजीव प्रथमेश गीते (Ex Deputy mayor Prathamesh Gite) लवकरच भाजप पक्ष सोडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्वतः गीते यांनी देशदूतशी बोलताना याबाबतची माहिती दिली. आज खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांची एक्स्प्रेसइन हॉटेल (Hotel Express Inn) इथे भेट घेऊन भाजपला (BJP) जोराचा झटका दिला आहे. भाजपडून या भेटीवर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही...

नाशिक महापालिकेवर(Nashik Municipal Corporation) पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे. एव्हाना सर्वच पक्षांनी अशा मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अधून मधून बड्या नेत्यांचा राबता असणे, अनेक कार्यक्रमांना, उपक्रमांना भेट देणे, कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेणे अशी कामे सध्या पक्ष करताना दिसून येत आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadanvis) यांचे सरकार असताना भाजपने मनसेनेला धक्का देत नाशिकची सत्ता काबीज केली होती.

संजय राऊत यांनी स्वत: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. भाजपला आणखी एक धक्का त्यांनी दिला आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी राऊत यांची भेट घेतली. गीते यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे.

पक्ष प्रवेशाची तारीख मात्र अद्याप निश्चित नसला तरीही स्वत: प्रथमेश गीतेंनी देशदूतशी बोलताना सांगितले की, आज राऊत साहेबांची भेट घेतली. आपला प्रवेश निश्चित आहे, लवकरच आपण प्रवेश करणार आहोत. योग्य वेळ आली की प्रवेशही होईल असे सांगितले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का समजला जात असून यापुढील भाजपची वाटचाल खडतर झाल्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com