Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; बड्या नेत्याचा गंभीर आरोप

भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; बड्या नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

राज्यात मागील वर्षी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार खासदारांनी मोठं बंड केलं होतं. तसेच यानंतर शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती.

- Advertisement -

सत्ता परिवर्तनानंतर भाजप शिवसेनेचं गुण्यागोविंदानं सत्तेत एकत्र नांदत असले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटातील आमदारांमधील नाराजी लपून राहिलेली नाही. याचवेळी आता एनडीएत भाजपकडून घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहेत.

नव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा! उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार

भाजपकडून शिंदे गटाच्या १३ खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. पण भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.

Sengol : नव्या संसद भवनात लावण्यात येणार ‘सेंगोल’… काय आहे ‘सेंगोल’चा इतिहास?

यावेळी गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही भाष्य केले. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही. २०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावापट झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २६ जागा लढवल्या. यापैकी २२ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील. त्यादृष्टीने आमची तयारी झाली आहे, असा दावाही गजानन कीर्तिकर यांनी केला.

पाच महिन्यात सोयाबीनचे दर १२०० रुपयांनी घसरले, खरीपाच्या तोडांवर शेतकरी हतबल

- Advertisment -

ताज्या बातम्या