शरद पवारांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस 'सिल्वर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

शरद पवारांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस 'सिल्वर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबईतील 'सिल्वर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या भेटीची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्यात राजकीय चर्चा झालीच असावी, अशी चर्चा रंगू लागली लागली आहे. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट होती.

दरम्यान, 'देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार यांच्या तब्येतीच चौकशी करायण्यासाठीच फडणवीस गेले असतील,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com