
मुंबई | Mumbai
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडीला मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून नागरिक अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान, शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनाला चौंडी जाण्यापासून रोखलं.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना सीमेवरच रोखल्याने पोलीस व पडळकर यांच्यात बाचबाची झाली. धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झल्यामे चौंडीत मोठा तणाव निर्माण झाला होता.
या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'हे अत्यंत चुकीचे आहे. आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला' असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
तसेच, 'जे अहिल्यादेवी याचे वंशज आहेत. त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. राम शिंदे जे स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत. त्यांनाही त्रास दिला असून याकी पुन्हा गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत तसा प्रकार घडला. पडळकर जे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांवर चालातात, त्यांना अडवण्यात येत आहे.' असंही ते म्हणाले.