१२ आमदारांच्या निलंबनावरून फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

१२ आमदारांच्या निलंबनावरून फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

मुंबई | Mumbai

पावसाळी अधिवेशनाची (monsoon season ) सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून भाजपच्या (bjp) आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर (State Govt) गंभीर आरोप केला.

१२ आमदारांच्या निलंबनावरून फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...
विधानसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप

विरोधी पक्षाचं (Opposition Party) संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना (MLA) सस्पेंड करण्यात आलं आहे. आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तसेच, 'ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. सरकारमुळे आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिलं. त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमच्या आमदारांना निलंबित केलं जाईल, ही माझी शंका होती. ती खरी झाली. ओबीसींसाठी बाराच आमदार काय आम्ही १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही लढा देत राहू,' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ते १२ आमदार कोण?

डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव

आशिष शेलार, वांद्रे पश्चिम

अभिमन्यू पवार, औसा, लातूर

गिरीश महाजन, जामनेर, जळगाव

अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई

पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई

हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला

राम सातपुते, माळशिरस, सोलापूर

जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे

योगेश सागर, चारकोप, मुंबई

नारायण कुचे, बदनापूर, जालना

कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com