Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याThe Kashmir Files चा वाद महाराष्ट्राच्या विधानसभेत

The Kashmir Files चा वाद महाराष्ट्राच्या विधानसभेत

मुंबई | Mumbai

‘द कश्मीर फाइल्स’ (the kashmir files) या चित्रपटाचा वाद थांबण्याचं नाव घेत नाही आहे. या चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही पोहोचला आहे. या चित्रपटावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

विधानसभेचं काम काज सुरू झालं तेव्हा कोणत्या सदस्यांना बोलण्यासाठी किती वेळ मिळतो यावर चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सदस्यांना बोलण्यास देण्याची विनंती केली. तसेच विरोधकांना बोलवण्यास वेळ दिला जात नसल्याचं सांगितलं. त्यावर काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते असे जयंत पाटील म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी, डंके की चोटपर सांगतो काल आम्ही सर्वजण द काश्मीर फाईल्स हा सिनेमा बघायला गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत नव्हतो, असं स्पष्ट केलं. तसेच तुम्हाला त्याच्यावर काही आक्षेप आहे का? तुम्हाला काही अडचण असेल तर बाहेर मांडा. असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी पक्षाकडून जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देत टोलेबाजी केली. ‘काश्मीर फाईल्स हा इंटरव्हलनंतर फार बोरिंग सिनेमा आहे, तो काही इंटरेस्टिंग सिनेमा नाही, बघा तुम्हाला माहीतच आहे. काश्मीर फाईल्सचं एवढं कौतुक असेल तर निर्मात्यांना १७ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या सिनेमातून कमावलेले १५० कोटी रुपये काश्मिरी पंडितांची घरे बांधण्यासाठी दान करायला सांगा,’ असं खोचक आवाहन जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना केलं आहे.

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट १९९० च्या घटनेवर आधारित आहे. ज्याने संपूर्ण देश हादरला होता. काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या मुद्द्यावर चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या