पडळकरांच्या जिवाला धोका; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

पडळकरांच्या जिवाला धोका; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

मुंबई l Mumbai

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनादेखील पत्र पाठवलं आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पडळकरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूनं उभं राहिल्यानं यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या, असं या पत्रात म्हटलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पडळकरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com