Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपकडून सत्तास्थापनेचा दावा; आज सायंकाळीच शपथविधी

भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा; आज सायंकाळीच शपथविधी

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह चाळीसहून अधिक आमदारांनी बंड केले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला….

- Advertisement -

यात त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपकडून (BJP) सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे.

आज शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थोड्यावेळापूर्वीच मुंबईत (Mumbai) पोहोचले. मुंबईत पोहोचताच त्यांनी ते आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. यानंतर फडणवीस आणि शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले.

राज्यपालांना भेटून भाजपने (BJP) सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दोघांचा आज राजभवनावर शपथविधी होणार आहे. आज सायंकाळी राजभवनात शपथविधी होणार असल्याचे समजते. फडणवीस आणि शिंदे हे थोड्या वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या