मोदींवर केलेली टिका जिव्हारी, भाजपकडून ठाकरेंवर जोरदार पलटवार

मोदींवर केलेली टिका जिव्हारी, भाजपकडून ठाकरेंवर जोरदार पलटवार

मुंबई | Mumbai

काल दसऱ्याच्या निमित्ताने दादर येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार घणाघात केला. खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली ही टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काॅंग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांनी इंडी आघाडीचे गोडवे गावे लागत आहे. नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. खरंत तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदी यांचं कुटुंब आहे, पण माझं कुटुंब-माझी जबाबदारी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही. अशी खोचक टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबाबत बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वत: च्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे. अशी ही टिका केली आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवतीर्थावर पुर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची!!! आता... "काँग्रेसी हृदयसम्राट" बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात!" असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात वाटले ते खरे विचारांचे सोने! शिवसैनिकांचा खरा भरगच्च मेळावा आझाद मैदानात महाराष्ट्राने पाहिला!!शिवतीर्थावर पुर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची !!! आता... "काँग्रेसी हृदयसम्राट" बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात! मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐकेरी उल्लेख केलात, त्यावरुन तुमची पातळी दिसली. सोबत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विरोधात दिलेला काढ्याचा असर झालाय हेही सगळ्यांना कळले!! हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांचे करपट ढेकरांना हे विचारांचे सोने म्हणतात!!" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com