थोरातांशी संगमनेरच्या चौकात जुगलबंदीस तयार

चंद्रशेखर बावनकुळे : अजेंडा नसलेले सरकार जनताच पंक्चर करणार
थोरातांशी संगमनेरच्या चौकात जुगलबंदीस तयार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राज्यात विविध प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहेत. मात्र तीनचाकीच्या सरकारचा अधिकार्‍यांवर कोणताही वचक नाही, ओबीसी आरक्षण (OBC Reservation) व मराठा आरक्षण (Maratha Reservation) वाचविण्यासाठी हे सरकार अपयशी (Government Failed) ठरले आहे. या सरकारकडे कुठलाही अजेंडा नाही. आगामी काळात हा अ‍ॅटो जनता पंचर केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भारतीय जनता पार्टी राज्य सरचिटणीस तथा भाजयुमोचे प्रभारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bavankule) यांनी व्यक्त केला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या विषयावर काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Congress leader, Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याशी संगमनेरातील (Sangmner) कोणत्याही चौकात चर्चेला आपण तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी संगमनेर दौर्‍यावर असतांना डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, नितीन दिनकर, योगीराज परदेशी, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा 288 विधानसभा, 97 हजार 646 मतदार केंद्रावर संपूर्ण गावामध्ये, नगरपालिका वार्डामध्ये युवा वॅरियर्स योजना राबवत आहोत. या अभियानामध्ये 25 लाख युवकांना भारतीय जनता युवा मोर्चा संघटन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील आत्म निर्भर भारत यामध्ये युवकांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. हे या अभियानाचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातून भाजपा 25 लाख युवकांचे संघटन करणार असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, या सरकारकडून शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही. विधी मंडळाचे अधिवेशन 15 दिवस ठेवायला पाहिजे होते. या सरकारने हे अधिवेशन दोन दिवसात गुंडाळले. मराठा आरक्षणाचे बाबतीतही सरकारचं लक्ष नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. काँग्रेस पार्टीचे (Congress Party) दोन नेते हायकोर्टात (Highcourt) गेले. 1994 ला दिलेले ओबीसी आरक्षण योग्य आहे. 1994 ला दिलेलं आरक्षण 2016 ला हायकोर्टात चॅलेंज केलं. कुणी केलं हे चॅलेंज? ना.बाळासाहेब थोरात यांना माझा सवाल आहे. ओबीसीचं आरक्षण जास्त होतं हे कोण बोललं. काँग्रेस पार्टीचे दोन नेते हायकोर्टात गेले.

27 टक्के ओबीसी आरक्षण ठेवा, असा आमच्या सरकारने वटहुकूम काढला होता. त्यानंतर आताचे सरकार आले. तो वटहुकूम लॅप्स झाला. संगमनेरच्या कुठल्याही चौकात बाळासाहेब थोरात यांच्याशी मी याविषयावर डिबेट करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला वटहुकुम मेंटेन केला असता तर ही परिस्थिती आज आली नसती. या सरकारच्या मनात ओबीसी व मराठा आरक्षण देण्याचे नाही. फक्त केंद्रावर ढकलायचे. केंद्राचा डेटा आणण्याचे प्रयत्न आमच्या सरकारने केला होता. ओबीसी आरक्षण हे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. डेटा तयार करण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मदत करायला तयार आहे. मात्र याच सरकारच्या मनात नाही असं दिसतंय. डिसेंबर 2021 पर्यंत या सरकारला वेळ दिली आहे, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com