Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापुरुषोत्तम खेडेकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशध्यक्षांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

पुरुषोत्तम खेडेकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशध्यक्षांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेनं (Shiv Sena) काँग्रेस(Congress), राष्ट्रवादीसोबत (NCP) जात गेल्या दोन वर्षापासून राज्य कारभार चालवला आहे. आता राज्यात आणखी एक राजकीय समीकरण जुळण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपविरोधी (BJP) भूमिकेसाठी आग्रही असलेले संभाजी ब्रिगेड (Sambhaji Briged) व मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे राज्याच्या राजकारणाचे वातावरण ढवळून निघाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आगामी काळात भाजपला (BJP) नवीन साथीदार मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात भाजपला मिळणार नवीन साथीदार

पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता भाजपची (BJP) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Briged) बदलत्या भूमिकेवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या संपादकीयमध्ये लेख लिहिला आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णयापर्यंत आलेलो नाही. खेडेकरांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या