'काही काळजी करू नका, परमेश्वर सगळ्यांचा हिसाब-किताब पूर्ण करतो'; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?

'काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात'
'काही काळजी करू नका, परमेश्वर सगळ्यांचा हिसाब-किताब पूर्ण करतो'; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांच्या नागपुरमधील घरावर देखील छापा मारण्यात आला आहे. या कारवाईवरून भाजपा नेत्यांकडून आता महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात आहेत. त्यामुळे काही काळजी करू नका, परमेश्वर सगळ्यांचा हिसाब-किताब पूर्ण करतो!' असे म्हंटल त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परबांवरही कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.

'अनिल देशमुख यांच्यावर कारवाई ही कायदेशीररित्या सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीही कळत नाही. ते विनाकारण भाजपवर आरोप करतात. सीबीआय न्यायालयाच्या आदेशानुसार काम करीत आहे. परमेश्वर सर्वांचा हिशोब करेन.' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

'सचिन वाझेने आपल्या पत्रात मंत्री अनिल परबांचाही उल्लेख केला होता. त्यामुळे अनिल परब आणि दर्शन घोडावद यांचीही सरकारने चौकशी केली पाहिजे. तसेच शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावरही एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्यांचीही केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करायला हवी. त्यामुळे काही जण सुपात आहेत, काही जण जात्यात आहेत'. अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे.

तसेच, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी, 'खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? असा प्रश्न उपस्थित करत, खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…'असं म्हणत टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे.' तसेच, 'खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम. एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही.' असं देखील भातखळकर म्हणाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com