आम्ही पिंजर्‍यातल्या नाही, जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो

चंद्रकांत पाटलांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
आम्ही पिंजर्‍यातल्या नाही, जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात केले होते. त्यावर ‘वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’, असं उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यांनी दिलं. त्यानंतर संजय राऊत यांच्या उत्तराला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही पिंजर्‍यातल्या नाही, जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आम्ही पिंजर्‍यातल्या नाही, जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो
नाशिकमध्ये राऊत म्हणाले, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची...

संजय राऊत काय म्हणाले

आज गुरुवारी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत’ अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com