प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई | Mumbai

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) याच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (DR. Pradnya Satav) यांचा विधानपरिषदेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (DR. Pradnya Satav) यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपनं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी आज ही घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी ही निवड बिनविरोधी व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, काॅंग्रेसचे दिवंगत विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या जागेवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली होती. खरतर राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा होती.

परंतु काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कदाचित प्रज्ञा यांना राजीव सातव यांच्या हिंगोली किंवा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्येच उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा सुरू होती. मात्र शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठीच प्रज्ञा सातव यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com